गेल्या काही काळापासून रशिया-यूक्रेन युद्ध सुरूच आहे. दोन्ही देशातील संघर्ष आणखीनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. दोन्ही देश एकमेकांवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले करत आहेत. याचदरम्यान, यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी एक विधान केले आहे. ज्यामुळे ते जगभरात चर्चेत आले आहेत. त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यावर एक वक्तव्य केलं आहे.
व्लादिमिर पुतिन लवकरच मारणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे जगभरातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. झेलेन्स्की यांनी नुकतीच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएव मॅक्रॉन यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पुतीन यांच्याबाबत असा दावा केला आहे. माध्यमांशी बोलताना झेलेन्स्की म्हणाले की, ‘पुतिन लवकरच मरतील आणि ही वस्तुस्थिती आहे. यानं सगळं संपेल.’ असे वक्तव्य त्यांनी माध्यमांसमोर केलं आहे. पण आता प्रश्न असा आहे की, झेलेन्स्की यांनी पुतीन यांच्याबाबत एवढा मोठा दावा कोणत्या आधारावर केला.
तर गेल्या काही काळापासून व्लादिमिर पुतिन यांची तब्येत काही ठीक नसल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये पसरत आहेत. अशास्थितीत त्यांच्या प्रकृतीबद्दल अनेक अंदाज बांधला जात आहे. पुतीन जेव्हा सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लवकतात तेव्हा देखील त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पुतिन कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. अशास्थितीत झेलेन्स्की यांचा हा दावा आरोग्याशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे.