भाजपने बंडखोर आमदार बसनगौडा पाटील यटनाल यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. बसनगौडा पाटील यटनाल याना दोनदा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी काढून टाकण्यात आले आहे. राज्यस्तरीय पक्ष नेतृत्वावर टीका आणि पक्षाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) केंद्रीय शिस्तपालन समितीने 26 मार्च रोजी एक पत्रक जारी करून यटनाल यांच्यावर पक्ष शिस्तीच्या वारंवार उल्लंघनांना गांभीर्याने घेत ही कारवाई केली असल्याचे सांगितले आहे. पक्षाने नोटीस बजावूनही तुम्ही वारंवार पक्ष शिस्तीचे उल्लंघन केले आहे याची गंभीर दखल घेतली आहे. असं पत्रकात सांगण्यात आलं आहे.
१० फेब्रुवारी रोजी पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली बसनगौडा पाटील यांना तीन महिन्यांत दुसरी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
यापूर्वी आमदार बसनगौडा पाटील यटनाल यांच्याविरुद्ध कन्नड चित्रपट अभिनेत्री रान्या राव यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता बसनगौडा पाटील यटनाल यांना पक्षविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.