तुम्ही देखील रोज लोकलने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे. होय, मध्य रेल्वेकडून लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खास योजना सुरु करण्यात आली आहे. ज्यांतर्गत प्रवाशांना दहा हजार रुपये बक्षीस जिंकण्याची संधी दिली जात आहे. या योजनेअंतर्गत उपनगरीय स्थानकांवर एका भाग्यवान तिकीट धारकाला १०,००० रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे. तसेच आठवड्याला ५०,००० रुपये बक्षीस देण्याचे आश्वासन दिले आहे.
खरं तर रोज लोकलने प्रवास करणारे काही प्रवासी तिकीट काढण्यास टाळाटाळ करतात. याला आला अघळण्यासाठी आणि प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
या योजनेत तुमच्याकडे रोज तिकीट असेल तर टीसी तुमच्यावर खुश होऊन तुम्हाला 10 हजार रुपयांचं बक्षीस देणार आहे. टीसी तुमचं तिकीट रोज तपासणार आणि तुमच्याकडे नियमित तिकीट असेल तर तुम्हाला रोख 10 हजार दिले जाणार आहे. एका आठवड्याला प्रवाशांना 50 हजारही जिंकता येणार आहे. या योजनेमुळे आता प्रवासीच तिकीट घेऊन टीसीकडे दाखव्याला जाऊ शकतात. असं बोललं जात आहे.
या योजनेत लकी प्रवाशाला रोज १०,००० रुपये बक्षीस मिळणार आहे. यामुळे जास्तीत जास्त प्रवासी रोज तिकीट काढून प्रवास करतील. ही योजना आठ आठवड्यांसाठी राबवण्यात येणार असून ही योजना FCB इंटरफेस कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड द्वारे राबवण्यात आली आहे.