रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच भारताचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निमंत्रण स्वीकारून व्लादिमीर पुतिन भारताचा दौरा करणार आहेत. रशियाच्या परराष्ट्र कार्यलयाकडून या दौऱ्याची माहिती देण्यात आली आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्रीसर्गेई लावरोव्ह यांनी सोशल मीडियावर या दौऱ्याविषयी माहिती देत आता आमची वेळ असल्याचे म्हंटल आहे.
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी सोशल मीडियावर लिहिले की, व्लादिमीर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भेटीचे निमंत्रण स्वीकारले असून, ते या दौऱ्याची तयारी करत आहे. दरम्यान, या दौऱ्याची तारीख अजून निश्चित झाली नसून, लवकरच तारीख ठरवण्यात येईल. असं त्यांनी म्हंटल आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचा दौरा केला होता. आता पुतीन भारत दौऱ्यावर येत असून, दोन्ही देशासाठी पुतीन यांची ही भेट महत्वाची असेल.
Preparations are being made for Russian President Putin's visit to India says Russian Foreign Minister Lavrov pic.twitter.com/IeldH0Tww0
— Sidhant Sibal (@sidhant) March 27, 2025
दरम्यान, पुतीन यांच्यानंतर पंतप्रधान मोदीरशियाचा दौरा करू शकतात. मे महिन्यात मॉस्कोमधील रेड स्क्वेअरवर ग्रेट पॅट्रियॉटिक वॉरमधील विजयाच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या परेडला मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या परेडमध्ये भारतीय लष्कराची एक तुकडी देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अध्यक्ष पुतीन यांचा भारतातील हा पहिलाच दौरा असणार आहे.