भारताच्या शेजारील देश म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सिस्मॉलॉजी सेंटरनुसार, म्यानमारमध्ये ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. यावरून हा भूकंप किती भयानक होता याचा अंदाज लावता येऊ शकतो. या भूकंपाचे धक्के दिल्ली-एनसीआरपर्यंत जाणवले आहेत. भूकंपानंतर झालेल्या नुकसानीबाबत म्यानमारकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, इतक्या तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
म्यानमारमधील हा भूकंपाने केवळ स्थानिक क्षेत्रच नव्हे तर ग्रेटर बँकॉक प्रदेशालाही हादरवून टाकले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे बँकॉकमधील उंच इमारतींमधील हजारो लोकांना इमारती खाली कराव्या लागल्या. अचानक झालेल्या या भूकंपामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
❗️Dramatic Footage Shows People Fleeing Dust Cloud As High Rise Building Crumbles In Bangkok
📹 – Social Media https://t.co/zOu6VgVuK1 pic.twitter.com/EEPAhOcln4
— RT_India (@RT_India_news) March 28, 2025
भूकंपाचे केंद्रबिंदू मध्य म्यानमारमध्ये होते, जे मोनीवा शहरापासून सुमारे ५० किलोमीट पूर्वेस आहे. गृहयुद्धाशी झुंजणाऱ्या म्यानमारला या भूकंपामुळे आणखीच झटका बसला आहे. भूकंपामुळे म्यानमारमध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे, परंतु याचा अहवाल अजूनही समोर आला नाही.