स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा चांगलाच मद्रास हायकोर्टाने दिलासा दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार केल्याने तो वादात अडकला आहे. या प्रकरणात कुणालला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. अशातच आता त्याने आपल्या अटकपूर्व जामिनासाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करताना कुणाल कामराने माहिती दिली की, ‘मुंबईत आल्यास आपल्या जीवाला धोका निर्माण होईल. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे.’
दरम्यान, आता मद्रास हायकोर्टाने यावर निकाल दिला असून, कुणाल कामराला ७ एप्रिलपर्यंत अटक करू नये, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. कोर्टाने कामराला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
काही दिवसांपूर्वी कुणाल कामराने आपल्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये त्याने देशातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे. यावेळी त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक वादग्रस्त गाणं देखील म्हंटल होत. ज्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं. कुणाल कामराचा व्हिडीओ ज्या स्टुडिओमध्ये शूट झाला होता, त्या स्टुडिओची शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. शिवाय कुणाल कामराने शिंदेंचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली आहे.