Ajit Pawar:महायुतीने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कर्जमाफीची आश्वासन दिले होते. परंतु महायुतीचे सरकार सत्तेत येऊन जवळपास चार महिने झाले तरी अद्याप कर्जमाफीचे आश्वसन सरकारने पूर्ण केले नाही. त्यातच अजित पवारांनी कर्जमाफीबद्दल महत्वाच वक्तव्य केले आहे.
२८ मार्च रोजी अजित पवार एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की,मी सभागृहात उत्तर देताना देखील सांगितले होते की सगळी सोंगं करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. त्यामुळे मी आज महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट सांगतो की, ३१ मार्चच्या आत आपआपले पीक कर्जाचे पैसे भरा.
याआधीही अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथील एका जाहीर कार्यक्रमात कर्जमाफीबाबत भाष्य करत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का?, असे अजित पवार म्हणाले होते. दरम्यान, आताही अजित पवार यांनी पुन्हा एकदा कर्जमाफीबाबत सूचक भाष्य केले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. परंतु या समितीचा अहवाल येईपर्यंत बँका, सोसायटी यांनी कर्जवसुलीचा तगादा लावू नये, अन्यथा कार्यालये पेटवून देण्यात येतील, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली होता.