राज्यात दिवसेंदिवस तापमान वाढत चाललं आहे. अनेक ठिकाणी उष्णतेची लाट पसरत आहे. अशातच हवामान
खात्याने नागरिकांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. राज्यात येत्या दिवसात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. अशातच आता नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळणार असून, काही प्रमाणात थंडी हवेची लाट पसणार आहे.
महाराष्ट्रात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
नगर, सांगली चंद्रपूर, लातूरमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला असून, सोलापूर, कल्हापूर, सातारा आणि सांगलीमध्ये रत्नागिरी, सिंधुदूर्गमध्ये पुढील 5 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, विदर्भात मात्र तापमान वाढत चालेल आहे. अकोल्यात ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. अशातच नागरिकांनी घराच्याबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून