नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही लागू करावी आणि देशाला हिंदू राष्ट्र करावे या मागणीसाठी नेपाळची राजधानी काठमांडू येथे आज पुन्हा निदर्शने करण्यात आली. या आंदोलना दरम्यान, आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चकमकीत अनेक पोलीस कर्मचारी तसेच आंदोलनकर्ते जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.
सध्या राजधानी काठमांडू येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आंदोलकांनी अनेक घरे, इमारती आणि वाहने जाळली आहेत. अशास्थितीत सध्या काठमांडूतील तिनकुने, सिनामंगल आणि कोटेश्वर भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, जेव्हा आंदोलक पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा सुरक्षा दलांनी त्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या तोफांचा वापर केला. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत.
शहरातील तिनकुने आणि भृकुटीमंडप भागात राजेशाही समर्थक आणि लोकशाही समर्थकांनी स्वतंत्र निदर्शने केली. या भागात हिंसाचार वाढू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते.
#WATCH | Nepal: Visuals from Kathmandu where a protester was seen damaging a CCTV camera while a plume of smoke rose after an arson.
A clash erupted between pro-monarchists and Police in Kathmandu today. The protesters are demanding the restoration of the monarchy. Curfew has… pic.twitter.com/5ZdEhipzx7
— ANI (@ANI) March 28, 2025
यावेळी काही आंदोलकांनी सरकारने प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या नवीन बनेश्वरकडे मोर्चा वळवण्याचा प्रयत्न करत होते. अशास्थितीत पोलिसांनी आंदोलकांना अडवून ताबयात घेतले आहे. नेपाळमध्ये सध्या वातावरण बिघडत असून सरकार आणि प्रशासन त्यावर कडक नजर ठेवून आहे.