सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. कलाकारांपासून ते मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांनी देखील या ट्रेंडमध्ये सहभाग घेतला आहे. हा ट्रेंड नेमका आहे तरी काय? ज्यात अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांनी देखील सहभाग घेतला आहे. व सोशल मीडियावर आपले घिब्ली जनरेटेड फोटो शेअर केले आहेत. पण हे घिब्ली नेमकं आहे काय? ज्याची सर्वांनाच भुरळ पडली आहे. पाहूया….
ओपनएआयच्या चॅट जीपीटीने नेटकऱ्यांसाठी एक नवी इमेज जनरेटर सेवा सुरू केली आहे. या इमेज जनरेटर सेवेचे नाव घिब्ली स्टुडिओ असे आहे. या घिब्ली फिचर मध्ये तुम्ही तुमचे फोटो अपलोड करून कार्टून इमेज तयार करू शकता.
सध्या जगभरातील सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर चॅट जीपीटीच्या घिब्ली जनरेटेड फोटोंचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. जभरातील सामान्य माणसांपासून ते जगभरातील मान्यवर नेते देखील एआय-जनरेटेड घिब्ली शैलीतील फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. इतकेच नव्हे तर अने बड्या ब्रँड्सना देखील या ट्रेंडची भुरळ पडली असून, ते याचा वापर त्यांच्या जाहिरातीसाठी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हे घिब्ली स्टुडिओ काय आहे ?
१९८५ मध्ये हयाओ मियाझाकी, इसाओ ताकाहाता आणि तोशियो सुझुकी यांनी स्थापन केलेला स्टुडिओ घिब्ली हा एक प्रसिद्ध जपानी अॅनिमेशन स्टुडिओ आहे.
घिब्ली शैली जपानी अॅनिमेशन चित्रपट स्टुडिओ ‘घिबली’च्या कला शैली आणि कार्टूनपासून प्रेरित आहे, जो त्याच्या रंगीत आणि जादुई दुनिया साठी प्रसिद्ध आहे.
ChatGPT वापरून Ghibli स्टाइल इमेज कशी तयार करत येते?
-आधी गूगलवर जाऊन ChatGPT उघडा.
-त्यांनतर तुम्हाला खाली दिलेल्या सर्च बार जाऊन प्लस चिन्हावर क्लिक करावे लागले.
-नंतर तुमची फोटो गॅलरी तुमच्या समोर असेल, तुमचा आवडता फोटो निवडा आणि फोटोच्या खाली, हा फोटो Ghibli स्टाइलमध्ये करा असं लिहा आणि सेंड करा.
-आता इमेज तयार झाल्यावर डाउनलोड करा आणि सोशल मीडियावर शेअर करा.
-OpenAI ने GPT-4o मध्ये सुधारणा केल्या असून, नवीन मॉडेल अधिक अचूक आणि संदर्भानुसार इमेज तयार करू शकते. मात्र, त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतील.