Devendra Fadnvis: मुंबईत 2008 मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ‘कुलाबा’ हे पाकिस्तानातून आलेल्या गुन्हेगारांसाठी लँडिंग स्पॉट बनले होते. कारण पाकिस्तानातून समुद्रमार्गे भारतात आलेला अजमल आमीर कसाब आणि त्याचे साथीदार दहशतवादी कुलाब्यातूनच मुंबईत दाखल झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी फडणवीस सरकार अॅक्शन मोडवरती आले आहे.
मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील एक बेकायदेशीर दर्गा आणखी एक लँडिंग स्पॉट म्हणून उदयास येत आहे. हा दर्गा दहशतवाद्यांसाठी सुरक्षित लँडिंग स्पॉट बनू शकतो, असा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या दर्ग्याचे स्थान समुद्राच्या अगदी जवळ आहे. तसेच गेल्या चार-पाच वर्षांत येथे बेकायदेशीर कारवाया झपाट्याने वाढल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र देवेंद्र फडणवी यांनी आता या दर्ग्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हा दर्गा मे 2025 पर्यंत पूर्णपणे पाडण्याचा महाराष्ट्र सरकारचा मानस आहे.
२०११ मध्ये, मीरा भाईंदरच्या कलेक्टरला लिहिलेल्या एका गुप्त पत्रात पोलिसांनी या दर्ग्याला सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचे सांगितले होते. समुद्रकिनारी हे ठिकाण असल्याने दहशतवादी या मार्गाने मुंबईत प्रवेश करून दर्ग्याचा लपण्यासाठी वापर करू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात होती. अशा परिस्थितीत आता या दर्ग्याकडे संभाव्य ‘सुरक्षित लँडिंग स्पॉट’ म्हणून पाहिले जात आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला हा निर्णय स्वागताहार्य म्हणावा लागेल. कारण भारतातील काही इस्लामी नागरिकांनी दशतवाद्यांना मदत केल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे मुस्लिमांचे प्रार्थनास्थळ असलेल्या दर्ग्यावरती जर लॅडिंग स्पाॅट म्हणून संशय व्यक्त केला जात असेल तर केव्हाही सतर्क राहिलेले भल्याचे ठरणार आहे.