Narendra Modi: इंडियन एक्स्प्रेसने भारतातत्या १०० प्रभावी लोकांची यादी 28 मार्च रोजी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या स्थानावर, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील 6 व्या क्रमांकावर स्थिर आहेत. गतवर्षीच्या यादीतही हे तीन नेते याच क्रमांकावर होते. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेप घेतली आहे. गेल्यावर्षीच्या 50 व्या स्थानावरून फडणवीसांनी थेट 13 व्या स्थानी झेप घेतली आहे.
या यादीमध्ये गौतम अदाणी राहुल गांधींचाही समावेश आहे. राहुल गांधी ९ व्या क्रमांकावर तर गौतम अदाणी ११ व्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे या बंधूंचा मात्र या शंभर नेत्यांच्या यादीत समावेश झालेला नाही.महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचाही या यादीत समावेश आहे. एकनाथ शिंदे हे ५१ व्या क्रमांकावर आहेत तर अजित पवार हे ५७ व्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांचा या यादीत ७७ वा क्रमांक लागला आहे. त्यामुळे शदर पवारांपेक्षा अजित पवाराचे वजन वाढल्याचे दिसून येत आहे.
१) नरेंद्र मोदी २) अमित शाह ३) एस. जयशंकर ४) मोहन भागवत ५) निर्मला सीतारमण ६) योगी आदित्यनाथ ७) राजनाथ सिंह ८) अश्विनी वैष्णव ९) राहुल गांधी १०) मुकेश अंबानी ११) गौतम अदाणी १२) पियूष गोयल १३) देवेंद्र फडणवीस १४) एन. चंद्राबाबू नायडू १५) नितीन गडकरी १६) संजय मल्होत्रा १७) भूपेंदर यादव १८) ममता बॅनर्जी १९) हरदीप सिंग पुरी २०) सिद्धरामय्या २१) नितीश कुमार २२) धर्मेंद्र प्रधान २३) एम. के. स्टॅलिन २४) जय शाह २५) एन चंद्रशेखरन २६) नीता अंबानी २७) जनरल उपेंद्र द्विवेदी २८) अनुमला रेवंथ रेड्डी २९) शिवराज सिंह चौहान ३०) नोएल नवल टाटा ३१) हिमंता बिस्वा सरमा ३२) पुष्कर धामी ३३) मल्लिकार्जुन खरगे ३४) मनसुख मांडवीय ३५) अजित डोवल ३६) विश्वनाथन आनंद ३७) उदय कोटक ३८) नायब सिंग सैनी ३९) मनोहर लाल खट्टर ४०) हेमंत सोरेन ४१) पिनरयी विजयन ४२) बीएल संतोष ४३) शक्तिकांता दास ४४) भगवंत मान ४५) संजीव खन्ना ४६) ओमर अब्दुल्ला ४७) दीपेंदर गोयल ४८) रोहीत शर्मा ४९) राजीव बजाज ५०) जे. पी. नड्डा
५१) एकनाथ शिंदे ५२) अरविंद केजरीवाल ५३) तुषार मेहता ५४) राजीव रंजन ५५) सरबंडाना सोनवाल ५६) ज्योतिरादित्य सिंधिया ५७) अजित पवार ५८) किरण रिजेजू ५९) चिराग पासवान ६०) सी. आर. पाटील ६१) प्रेमा खंडू ६२) विष्णू देव साई ६३) प्रमोद सावंत ६४) भूपेंद्र पटेल ६५) रेखा गुप्ता ६६) मोहन यादव ६७) भजनलाल शर्मा ६८) सुनील भारती मित्तल ६९) प्रताप सी रेड्डी ७०) अरविंद श्रीनिवास ७१) अजय कुमार भल्ला ७२) विराट कोहली ७३) कोनिडेला पवन कल्याण ७४) विजय ७५) टीव्ही सोमनाथन ७६) निखिल कामथ ७७) शरद पवार ७८) पी. के. शर्मा ७९) मनोज सिन्हा ८०) किरण नाडार ८१) प्रियांका गांधी वाड्रा ८२) शशी थरुर ८३) जसपित बुमराह ८४) तुहीन कांता पांडे ८५) डी. के. शिवकुमार ८६) तेजस्वी यादव ८७) अखिलेश यादव ८८) गजेंद्र सिंग शेखावत ८९) असदुद्दीन ओवैसी ९०) एच. डी. कुमारस्वामी ९१) कुमार मंगलम बिर्ला ९२) अल्लू अर्जुन ९३) रामदेव ९४) सुखविंदर सिंग सुखू ९५) व्ही. नारायणन ९६) करण जोहर ९७) शाहरुख खान ९८) दिलजीत दोसांज ९९) अमिताभ बच्चन १००) आलिया भट्ट