गुडीपाडव्याच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरात दाखल झाले आहेत. सकाळी नऊच्या दरम्यान, पंतप्रधान नागपुरात पोहचले असून, प्रथम त्यांनी रेशिमबाग येथील संघ स्मृती मंदिर परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केले. पंतप्रधान मोदींसोबत यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित होते. २०१४ नंतर पहिल्यांदाच मोदींनी संघ स्मृती मंदिराला भेट दिली आहे.
Visiting Smruti Mandir in Nagpur is a very special experience.
Making today’s visit even more special is the fact that it has happened on Varsha Pratipada, which is also the Jayanti of Param Pujya Doctor Sahab.
Countless people like me derive inspiration and strength from the… pic.twitter.com/6LzgECjwvI
— Narendra Modi (@narendramodi) March 30, 2025
संघ स्मृती मंदिराला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आपल्या सोशल काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत पोस्टमध्ये मोदींनी लिहिले, ‘नागपूरमधील स्मृती मंदिराला भेट देणे हा एक अद्भुत अनुभव आहे….आजची भेट आणखी खास बनवणारी गोष्ट म्हणजे ती वर्षा प्रतिपदेला झाली आहे. जी परमपूज्य डॉक्टर साहेबांची जयंती देखील आहे. माझ्यासारखे असंख्य लोक परमपूज्य डॉक्टर साहेब आणि पूज्य गुरुजींच्या विचारांपासून प्रेरणा आणि शक्ती मिळवतात. मजबूत, समृद्ध आणि सांस्कृतिकदृष्ट्या अभिमानी भारताची कल्पना करणाऱ्या या दोन महान व्यक्तींना आदरांजली वाहणे हा एक सन्मान होता…’
दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींनी या परिसराची पाहणी केली तसेच संघ पदाधिकाऱ्यांशी संवाद देखील साधला. त्यानंतर त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींचे दर्शनदेखील घेतले. मोदींच्या या दौऱ्यानिमित्त नागपूरात आज मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आला आहे.