ओडिशामध्ये दिल्ली आणि आसाम दरम्यान धावणाऱ्या कामाख्या एक्सप्रेसचे ११ एसी डबे रुळावरून घसरले.त्यानंतर प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर अनेक प्रवासी जखमी झाल्याची भीती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरू-कामाख्या सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन ओडिशाच्या चौधरजवळ रुळावरून घसरली. ट्रेनचे किमान ११ डबे रुळावरून घसरले आहेत. सकाळी ११.५४ वाजता ही दुर्घटना घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर अनेक प्रवासी जखमी झाल्याची भीती आहे.मात्र, रेल्वे प्रशासनाने अद्याप याला अधिकृत दुजोरा दिला नाही. या अपघाताची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. रेल्वे प्रशासनासह स्थानिक पोलीस यंत्रणा, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या स्थळी सुखरूप पोहोचता यावे यासाठी प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
ईस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ अशोक कुमार मिश्रा म्हणाले की, आम्हाला कामाख्या एक्सप्रेस (१५५५१) चे काही डबे रुळावरून घसरल्याची माहिती मिळाली आहे. ते म्हणाले, ‘आतापर्यंत आम्हाला ११ एसी कोच रुळावरून घसरल्याची माहिती मिळाली आहे. कोणीही जखमी झालेले नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. असे त्यांनी सांगितले. सीपीआरओ पुढे माहिती देताना म्हणाले की, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही लवकरच घटनास्थळी पोहोचणार आहेत. डीआरएम खुर्द रोड, जीएम/ईसीओआर आणि इतर वरिष्ठ पातळीवरील अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास चालू आहे.