Mumbai: काल गुढी पाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आयोजित केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय मुद्यांवर आपल्या विचारांची मांडणी केली. त्यांनी कुंभमेळा, धर्म, प्रदूषण, नद्या आणि इतिहासासंबंधी अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले. महाराष्ट्रात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरु असताना या वादातही त्यानी उडी घेतली.आणि यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.
राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या सजावटीवर टिप्पणी करत सांगितले की, औरंगजेबाच्या कबरीजवळ केलेली सजावट काढून टाका. तिथे फक्त कबर दिसली पाहिजे. औरंगजेबाने संभाजी राजांना क्रूर पद्धतीने मारलं. औरंगजेबाशी राजाराम महाराज, ताराराणी साहेब, संताजी आणि धनाजी यांनीही लढा दिला. औरंगजेबाला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता पण तो त्याला जमला नाही.
आम्हा मराठ्यांनी त्याला संपवायला आणले आणि इथे गाडले. हे जगाला कळू द्या,यादरम्यान राज ठाकरे यांनी चित्रपटांचा उल्लेख करुन हिंदूंच्या जागरणावरही ताशेरे ओढले. “चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत. विकी कौशलचा मृत्यू झाल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान समजले काय?” असा सवाल करत त्यांनी ऐतिहासिक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
सध्या माथी भडकवण्याचे काम सुरु आहे. इतिहासाच्या मुळाला गेला ना तुमच्या अपेक्षांची भांडी फुटतील असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.अखेर, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना, राज ठाकरे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे एक चमत्कार आहेत, तसेच हा एक विचार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.