आज रमजान ईदच्या निमित्ताने भारतामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या जल्लोषात ईद साजरी करत आहेत. अनेक ठिकाणी आज ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांकडून रॅली देखील काढण्यात आली. दरम्यान आज ईद साजरी करताना काही कट्टरतावाद्यांनी पॅलेस्टाईनचे झेंडे देखील फडकवले.
हरियाणातील नूह शहरात ईद साजरी करताना काही कट्टरतावाद्यांनी पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवले. पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ लोकांनी हातात पॅलेस्टाईनचा झेंडा आणि फलक घेऊन मुरवणूका काढल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘हे संपूर्ण प्रकरण नूह शहरातील घसेडा या ग्रामीण भागातील आहे. यावेळी वक्फ विधेयकाच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या लोकांनी हातात काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. त्यांनी काळ्या पट्ट्या बांधून नमाज देखील अदा केली. तसेच रस्त्यावर उतरून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मिरवणूक देखील काढली.
यावेळी सर्वजण हातावर काळ्या पट्ट्या बांधून नमाजासाठी आले होते. अशाप्रकारे त्यांनी वक्फ विधेयकाला विरोधही व्यक्त केला. सुरक्षेच्या कारणास्तव येथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
इस्राईलने पॅलेस्टाईनवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करत त्यांनी रॅली काढली. इस्राईलने पॅलेस्टाईनवर केलेल्या हल्ल्यामुळे जगभरातील मुस्लिम त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांनी ईदच्या दिवशी पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला आहे. मिरवणुकीत कट्टरतावाद्यांनी फलक हातात घेतले होते ज्यावर सर्व बांधवांनी पॅलेस्टाईनसाठी प्रार्थना करावी असे लिहिले होते.