अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणनेही आमच्यावर हल्ला केला तर आम्ही देखील अणुबॉम्ब वापरू अशा इशारा दिला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आण्विक कराराबाबत इशारा दिला होता. त्याला प्रत्युत्तर देत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनीही प्रतिहल्ल्याचा इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचे सल्लागार अली लारिजानी यांनी म्हटले आहे की, ‘अमेरिकेने आमच्यावर हल्ला केला तर त्यांच्याकडे बचावाशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरणार नाही. आम्ही सध्या अणुबॉम्बच्या दिशेने जात नाही, पण जर तुम्ही इराणला आण्विक मुद्द्यावर सुनावले तर आम्ही देखील गप्प बसणार नाही. कारण आम्हालाही स्वतःचे संरक्षण करायचे आहे.’ असं त्यांनी म्हंटल आहे.
ते पुढे म्हणाले की, ‘इराणला हे नको आहे, पण…आमच्याकडे दुसरा पर्याय नसेल,’ अमेरिका किंवा इस्राईलने इराणवर हल्ला केला तर इराण देखील त्याचा पुनर्विचार करेल. तुम्ही जर बॉम्बस्फोट घडवून आणत असाल तर इराणला देखील असाच निर्णय घेण्याच्या दिशेने पाऊल ठेवेल. असं देखील त्यांनी म्हंटल आहे.
शनिवारी ट्रम्प म्हणाले होते की, ‘जर इराण करारासाठी तयार नसेल तर बॉम्बहल्ला केला जाईल. मात्र, त्यावेळी ट्रम्प यांनी या योजनेबाबत उघडपणे बोलले नाही. त्यादरम्यान खामेनी म्हणाले होते, ‘जर त्यांनी कोणतीही धमकी दिली आणि त्यांनी हल्ला केल्यास त्यांना जोरदार प्रत्युत्तर मिळेल.’
खरं तर इराणच्या युरेनियम शुद्धीकरणाचा प्रकल्प अखेरच्या टप्प्यामध्ये असून लवकरच ते अण्वस्त्र निर्मितीचा टप्पा गाठतील अशी शंका युरोपीय देशांनी व्यक्त केली आहे. इराणने मात्र आमचा आण्विक प्रकल्प हा केवळ नागरी उद्देशानेच राबविला जात असल्याचे म्हटले आहे. यावरूनच ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे.