नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच शासनाने नागरिकांना एक सुखद धक्क्का दिला आहे.तो म्हणजे तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट केल्याने 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत, ज्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक क्षेत्रांना मोठा फायदा होणार आहे.खरतर हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा ठरला आहे.
राजधानी दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत देशातील सर्वच महानगरामध्ये १ एप्रिल २०२५ पासून या निर्णयाची अमलबजावणी होणार आहे. मुंबईत, व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 41 रुपयांची घट करण्यात आली आहे. या नवीन दरानुसार मुंबईत व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1714.50 रुपये असेल, ज्यापूर्वी ती 1755.50 रुपये होती. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 41 रुपयांची कपात करण्यात आली आहे. दिल्लीत आता व्यावसायिक सिलेंडर 1762 रुपयांना उपलब्ध होईल, तर पूर्वी याची किंमत 1803 रुपये होती. कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1913 रुपयांवरून 1872 रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये या सिलेंडरच्या किंमती 1965 रुपये असतील.
तथापि, घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सध्या मुंबईत घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर 802.50 रुपये, दिल्लीत 803 रुपये, कोलकातामध्ये 829 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये याप्रमाणे उपलब्ध आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत २०२४ मध्ये कपात करण्यात आली होती. तेंव्हापासून आतापर्यंत घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर चे दर स्थिर आहेत.ज्यामध्ये अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही.