आज लोकसभेत दुपारी १२ वाजता वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात आले. यावेळी बोलताना वक्फ बोर्डाने या संसदेवर सुद्धा दावा केला असता असे केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हंटले आहे. या देशात बरं झालं यूपीएची सत्ता आली नाही आणि भाजपचे सरकार आहे. भाजपची सत्ता आली नसती तर वक्फ बोर्डाने या संसदेवर सुद्धा दावा केला असता असे केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितले आहे. एवढेच नव्हे तर वक्फ संशोधन विधेयकात सरकार कुणाच्या धार्मिक मान्यतेवर किंवा धर्माच्या पालनात हस्तक्षेप करत नाही असेही ते सभागृहात बोलताना म्हणाले आहेत.
किरेन रिजीजू नेमके काय म्हणाले?
संसदेत बोलताना किरेन रिजीजू यांनी अनेक महत्वाच्या मिद्यावर भाष्य केले. कॉंग्रेसचा या बिलाला विरोध पाहता किरेन रिजीजू म्हणाले की काँग्रेसने केवळ व्होट बँकेचे राजकारण केले, वक्फ दुरुस्ती विधेयकाचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे. तसेच वक्फ बोर्डाच्या सदस्यांच्या सहभागाविषयी बोलताना ते म्हणाले की शिया आणि सुन्नी सर्वजण वक्फ बोर्डात राहतील. एवढेच नाही तर वक्फ बोर्डात महिलाही असतील. वक्फ बोर्डात 10 मुस्लिम सदस्य असतील. तसेच सरकारला मुस्लिमांच्या देणग्यांशी देणेघेणे नाही.जगात सर्वाधिक वक्फ मालमत्ता फक्त भारतातच आहेत, मग आपले मुस्लिम गरीब का आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना रिजीजू म्हणाले की वक्फ बोर्डात दोन महिला नक्कीच असतील. त्यामुळे सर्वांचा सहभाग कायम राहील. लोकांना या मालमत्तेचा फायदा का झाला नाही? तसेच यावेळी लोकांच्या हितासाठी वक्फ विधेयक आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
वस्तुतः वक्फ सुधारणा विधेयक हे किरेन रिजीजू यांनी सभागृहात मांडले आहे. भाजपाकडून या विधेयकावरील चर्चेमध्ये किरेन रिजीजू, अनुराग ठाकूर, जगदंबिका पाल, अभिजित गंगोपाध्याय, स्मिता वाघ, तेजस्वी सूर्या, निशिकांत दुबे सहभागी होणार आहेत. तर काँग्रेसकडून गौरव गोगोई, इमरान मसूद आणि मोहम्मद जावेद बोलतील. याचप्रमाणे शरद पवारांच्या पक्षाकडून या विधेयकावर निलेश लंके, फौझिया खान बाजू मांडणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून अरविंद सावंत चर्चेत सहभागी होती. एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून त्यांचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदे बाजू मांडतील.