आज लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात आले. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर होताच मुंबईत जल्लोष साजरा करण्यात आला. मुंबईतील मुस्लिम बांधवानी हा आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मुस्लिम बांधवानी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले.
संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक चर्चेसाठी मांडले. देशभरात वक्फशी निगडित ३० हजार प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. तसेच जगातील सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाकडे आहे. तरीही मुस्लीम गरीब का आहेत? असा सवाल रिजिजू यांनी यावेळी उपस्थित केला. या मालमत्तांचा वापर गरीब मुस्लीमांसाठी व्हायला हवा होता, असेही त्यांनी यावेळी म्हंटले आहे.
लोकसभेत सादर करण्यात आलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगु देशम पार्टी (टीडीपी) आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जेडीयू) यांनी समर्थन दर्शवले आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी या विधेयकावर आक्षेप घेतला आहे.
#WATCH | Members of Mumbai BJP Minority Morcha in Mumbai's Borivali celebrate ahead of tabling of Waqf Amendment Bill 2024 by the Central government in Parliament today
President of Mumbai BJP Minority Morcha, Wasim R Khan says, "I thank PM Modi for bringing this bill as it… pic.twitter.com/QS48vQIkiJ
— ANI (@ANI) April 2, 2025
विरोधी पक्षांनी या विधेयकाविरोधात आज लोकसभेत गोंधळ घातला असला तरी देखील मुंबईतील मुस्लिम बांधवांनी या सुधारित विधेयकाचे स्वागत केले आहे. या विधेयकाच्या बाजूने उभे राहत मुस्लिम बांधवानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार देखील मानले आहेत. हे विधेयक गरीब मुस्लिमांना मोठा आधार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. खासकरून मुस्लिम महिलांनी विधेयकाच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.