वक्फ (सुधारणा) विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं आहे. संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक मांडले आहे. आता या विधेयकावरून राज्यात अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. याचदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्र सरकराने या विधेयकावर चर्चा करण्यासाठी आठ तासांची वेळ निश्चित केल्यानंतर देशातील राजकारण चांगलेच तापले. या विधेयकावरून देशभरात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याचदरम्यान देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
वक्फ दुरुस्ती विधेयकावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक आमचा पाठिंबा आहे…या विधेयकामुळे मुस्लिम महिलांना पुन्हा एकदा वक्फ बोर्डात स्थान मिळालं आहे. तीन तलाकनंतर वक्फ बोर्डात महिलांना संधी मिळत आहे. हे विधेयक कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही…ज्या चुका झाल्या त्या सुधारण्यासाठी हे विधेयक आहे… या विधेयकाला सद्सदविवेकबुद्धी जागृत असलेला विरोध करणार नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरम्यान, सध्या राज्यात वक्फ दुरुस्ती विधेयकावरून गोंधळ सुरु आहे. विरोधक या विधेयकाच्या विरोध करत असून, या विधेयकाबद्दल चुकीचा प्रचार करत आहेत.
हे विधयेक मंजूर झाल्यास सरकार वक्फ बोर्डाची मालमत्ता जप्त करेल अशी भीती मुस्लीम धर्मीयांमध्ये निर्माण केली जात आहे. मात्र, सरकारचा असा कोणताही हेतू नसून, वक्फ बोर्ड व्यवस्थापन सुधारणे आणि प्रशासनात पारदर्शकता वाढवणे आहे. वक्फ बोर्डाच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या शेवटपर्यंत वक्फ बोर्डाकडेच राहणार आहेत.