दक्षिण कोरियाच्या घटनात्मक न्यायालयाने शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष यून सुक-येओल यांच्या महाभियोगाला एकमताने मंजुरी दिली आहे. ज्यामुळे आता त्यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आले आहे. डिसेंबरमध्ये त्यांनी देशात मार्शल लॉ लागू केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच न्यायालयाने देशात 60 दिवसांच्या आत नवीन सरकार स्थापन करण्यास न्यायालयाने सांगितले आहे.
संविधान आणि कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून गेल्या वर्षी डिसेंबरच्या मध्यात विरोधी पक्षाने यून सुक-येओल यांच्यावर महाभियोग चालवला होता. यून सुक-येओल यांनी देशात ३ डिसेंबर रोजी मार्शल लॉ जाहीर केला होता. ज्यामुळे त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्यात आला.
यून सुक-योल यांनी ३ डिसेंबर रोजी मार्शल लॉ जाहीर करत, खासदारांना आदेश रद्द करण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रीय असेंब्लीत सैन्य तैनात केले आणि राजकारण्यांना अटक करण्याचे आदेश दिले. ज्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
न्यायालयाने निकाल देताना म्हंटले की, ‘कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे संवैधानिक व्यवस्थेवर याचा नकारात्मक परिणाम झाला आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी यून यांना पदावरून काढून टाकणे राष्ट्रीय नुकसानापेक्षा खूपच जास्त आहे.’