Jadavpur University Kolkatta: जादवपूर विद्यापीठ तृणमूल काॅग्रेसच्या अधिपत्याखाली येणारे राज्य विद्यापीठ आहे. मात्र गेली काही वर्ष या विद्यापीठात डाव्या विचारसरणीचा वाढता परिणाम आणि वारंवार घडणाऱ्या हिंदुविरोधी कारवायांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे हे विद्यापीठ देशद्रोहींचा अड्डा बनले आहे. नुकताच आता या विद्यापीठात रामनवमी(Ram Navami) साजरी करण्यावरून एक नवीन वाद निर्माण झाला आहे.
हिंदू विद्यार्थी संघटनेने विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये ६ एप्रिल रोजी रामनवमी साजरी करण्याची योजना आखली आहे. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव डाव्या विचारसरणीच्या स्टुडंट्स फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेने रामनवमीच्या कार्यक्रमाला विरोध दर्शविला आहे. आता डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेविरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवे आंदोलन पुकारले आहे.
हिंदू विद्यार्थी संघटनेच्या एका सदस्याने दोन दिवसांपूर्वी म्हटले होते की, या वर्षी आम्ही रामनवमी कॅम्पसमध्ये साजरी करण्याचा निर्धार केला आहे. गेल्या वर्षी आम्हाला सुरुवातीला परवानगी देण्यात आली होती, परंतु नंतर निषेधांमुळे ती नाकारण्यात आली. यावेळी, आम्ही परवानगी मागितली आहे आणि आमच्या निर्णयावर ठाम आहोत. मात्र आता कुलगुरू नसल्याचे कारण देत विद्यापीठाचे प्रशासनानेच कॅम्पसमध्ये रामनवमी साजरा करण्याची परवानगी नाकारली आहे. त्यानंतर हिंदू विद्यार्थी संघटना आणि इतर आयोजकांनी विद्यापीठाच्या निर्णयाचा निषेध करत हा निर्णय निवडक तुष्टीकरणाचा स्पष्ट प्रकार असल्याचे म्हटले आहे. त्याामुळे आता एक नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गेली काही वर्षे या विद्यापीठात वारंवार अशा देशद्रोही आणि हिंदूविरोधी घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे तरी देखील पश्चिम बंगाल सरकारकडून याबाबत काहीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. विद्यादान हे आद्य कर्तव्य असलेले जादवपूर विद्यापीठ मात्र विद्यार्थांऐवजी देशद्रोही आणि दहशतवादी घडवत आहे.