भाजपच्या स्थापनेचा इतिहास
थोर हिंदुत्ववादी नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रेरणेने जन संघाची स्थापना झाली. त्याची वैचारिक बैठक ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची होती. त्यानंतर पुढे हळूहळू हिंदुत्वाला धरत काँग्रेसला विरोध करत हा पक्ष जनमानसात रुजू लागला. १९७८ नंतर सत्तेत आलेल्या जनता पक्षाच्या राजवटीत या पक्षाने सत्ता देखील उपभोगली. पुढे जनता पक्ष फुटला आणि त्यातून बाहेर पडत भारतीय जनता पक्षाची म्हणजेच भाजपची स्थापना झाली. आज त्याच भाजपचा ४१ वा स्थापना दिवस आहे. दिनांक ६ एप्रिल १९८० रोजी अटलबिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली जनसंघातून बाहेर पडलेल्या लोकांनी भाजपची स्थापना केली. अटलबिहारी वाजपेयी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी स्थापन केलेल्या भाजपला १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत केवळ दोनचं जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर हळूहळू पुन्हा त्यांनी पक्ष वाढवला. १९९० च्या दशकात भाजपला जनतेने साथ द्यायला सुरवात केली. त्यामुळे त्यामुळे १३ दिवस, १३ महिने आणि पाच वर्षाचा कार्यकाळ अटल बिहारी वाजपेयी यांनी पूर्ण केला. त्यानंतर भाजपने २०१४ मध्ये तब्बल २८२ जागा जिंकल्या आणि २०१९ मध्ये त्यांच्या जागांची संख्या ३०२ झाली.
केवळ ३ मतांमुळे बहुमताच्या सरकारमधून वाजपेयी आणि अडवाणी यांना बाहेर काढण्यात आले होते. त्याच्या दोन दिवसानंतर भाजपची स्थापना झाली. अडवाणींनी भाजपची स्थापना कशी झाली ते सांगितले. त्यांनी सांगितले की, ‘१९८० च्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षातील संघविरोधी मोहिमेने कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला होता. याचा काँग्रेसला स्पष्टपणे फायदा झाला आणि निवडणुकीत जनता पक्षाची कामगिरी खालावण्याचा प्रयत्न झाला. एप्रिलमध्ये नवी दिल्लीत जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत दुहेरी सदस्यत्वाबाबत अंतिम निर्णय होणार होता. परंतु जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने १७ तडजोडीचा फॉर्म्युला फेटाळून लावला. १४ च्या बाजूने मतदान झाले आणि माजी जनसंघ सदस्यांची हकालपट्टी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आणि भाजप पक्ष स्थापन झाला.
अनेक महत्वाचे मुद्दे भाजपने पाहिल्यापासून आपल्या अजेंड्यावर ठेवले होते. त्यापैकी प्रत्येकावर काम केल्याचं दिसतय. त्यात प्रामुख्याने उल्लेख करता येईल तो काश्मीरला स्वतंत्र घटना देणारे कलम ३७०, राम मंदिर, वक्फ कायदा आदी तसेच समान नागरिक कायदा या मुद्द्यावर देखील भाजप लवकरच निर्णय घेणार असल्याचं बोललं जातंय.
दरम्यान, देशातील सध्याचा सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेला भाजपचा आज स्थापना दिवस आहे. स्थापना दिनानिमित्त भाजपकडून जोरात तयारी सुरू आहे.