राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयांविरुद्ध अमेरिकेतील नागरिक संतापले असून, रस्त्यावर उतरले आहेत. देशभरात विविध ठिकाणी नागरिकांकडून पोस्टर हातात घेऊन ‘हॅन्ड्स ऑफ’ निदर्शने करण्यात आली आहेत.
फेडरल कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे, अर्थव्यवस्था, मानवाधिकार आणि इतर मुद्द्यांवरून डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेले एलॉन मस्क यांना आता नागरिकांनी घेरले आहे.
नागरी हक्क संघटना, कामगार संघटनांसह 150 हून अधिक संघटनांकडून 1,200 हून अधिक ठकाणी ही निदर्शने करण्यात आली आहेत. सांगितले जात आहे की, ट्रम्प सत्तेत परतल्यानंतर हे सर्वात मोठे आंदोलन आहे.
यावेळी निदर्शकांनी, हजारो फेडरल कर्मचाऱ्यांना काढून टाकणे, सामाजिक सुरक्षा प्रशासनाची प्रादेशिक कार्यालये बंद करणे, संपूर्ण एजन्सी प्रभावीपणे बंद करणे, स्थलांतरितांना निर्वासित करणे, ट्रान्सजेंडर लोकांसाठी संरक्षण कमी करणे व आरोग्य कार्यक्रमांसाठी फेडरल निधी कमी करणे यासाठी ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.
याशिवाय मस्क यांच्याविरोधात देखील या निदर्शनांमध्ये घोषणाबाजी करण्यात आली. मस्क हे ट्रम्प सरकारचे सल्लागार असून, त्यांची सरकारी कर्मचारी कमी करण्यात मोलाची भूमिका असून त्यांच्याविरोधात देखील निदर्शने करण्यात आली.
दरम्यान, अमेरिकेत ट्रम्प यांच्या विरोधात सुरु असलेली निदर्शने मोठे वळण घेऊशकतात. असे बोलले जात आहे.