Jasprit Bumrah: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indiance)स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह बराच काळ दुखापतग्रस्त होता. त्यामुळे बुमराह आयपीएल 2025 चे (IPL 2025) सामने खेळत नव्हता. त्यामुळे त्याचे चाहते नाराज होते. मात्र आता त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून आता तो आयपीएल 2025 साठी मुंबई इंडियन्समधून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे. जसप्रीत बुमराह आरसीबीविरुद्ध(RCB) या हंगामातील पहिली मॅच खेळणार आहे.
याबाबतची माहिती मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत दिली आहे. मुंबई इंडियन्सने एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्यामध्ये म्हटले आहे की, अन् पलटणचा वाघ येत आहे. जसप्रीत बुमराह बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपासून क्रिकेटपासून लांब होता. त्यामुळे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीला देखील मुकावे लागले. परंतु आता तो आयपीएल खेळण्यासाठी येत असल्याने त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
बुमराहच्या अनुपस्थितीत आतपर्यंत मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी राहिली आहे. मुंबईला 4 पैकी फक्त 1 सामनाच जिंकता आला आहे. तर मुंबईने 3 सामने गमावले आहेत. मात्र आता मुंबईचा हुकमाचा एक्का परतल्याने मुंबई टीमला दिलासा मिळाला आहे. कारण विकेट घेण्याच्या बाबतीत बुमराहचा मोठा दबदबा पाहायला मिळतो. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत आयपीएलमध्ये 165 विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान, बुमराहला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनी कसोटी सामन्यादरम्यान 4 जानेवारीला दुखापत झाली होती. या दुखापतीमळे बुमराहला चॅम्पियन्स ट्रॉफीपासून दूर राहवे लागले होते. तसेच आयपीएलच्या 4 सामन्यांतून देखील बाहेर रहावे लागले.