काल रामनवमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामेश्वरम येथील पंबन पुलाचे उद्घाटन झाले. या पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर हा पूल सर्वत्र चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. हा भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या पुलांपैकी एक आहे. पंबन पूल समुद्रावर बांधलेला इतिहासातील पहिला व्हर्टिकल सी पूल आहे. दरम्यान, आजच्या बातमीतून आपण या पुलाची सर्व वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग…
पंबन पुलाची वैशिष्ट्ये ?
-1914 पासून आतापर्यंत हा ब्रिज रामेश्वरम बेट आणि मुख्य भारत बेटातील महत्वाचा दुवा आहे. डिसेंबर 2022 पुलाच्या दुर्व्यवस्थेमुळे तो बंद करण्यात आला होता. आता पंबन पूल नव्या तंत्रज्ञानासह पुन्हा वाहतुकीसाठी सज्ज आहे. नवीन पूल विशिष्ट तंत्रज्ञाने सुसज्ज असून, प्रवास अगदी सोपा झाला आहे.
-पंबन पूल हा रेल्वेच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा पूल आहे. समुद्राच्या पाण्यावर बांधलेला हा पहिला व्हर्टिकल सी पूल आहे.
-पंबन पुल 535 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे.
-या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे हा व्हर्टिकल लिफ्ट तंत्रज्ञानावर आधारित असून, मोठी जहाजे समुद्रातून जात असताना हा पूल वरती करता येतो. या पुलामुळे तामिळनाडूमधला प्रवास सोपा तर झाला आहेच पण व्यावसायिक दृष्ट्या देखील हा पूल महत्वाचा ठरला आहे.
-हा पूल भारतातील पहिला ऑटोमेटेड वर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल आहे.
-हा पूल 2.08 किलोमीटर लांब आहे. यात 99 स्पॅन आहेत. या पुलाचा वरती उचलण्याचा भाग ७२.५ मीटर लांब आहे. अशातच देशातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
-जुना पूल मूळत: मीटर गेज रेल्वेसाठी बांधण्यात आला होता. फेब्रुवारी 2019 मध्ये, रेल्वे मंत्रालयाने जुन्या पुलाचे पुनर्वसन करण्यास मंजुरी दिल्यानंतर हा पूल आता नवीन तंत्रज्ञाने सुसज्ज असून, सर्व वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
-हा पूल 2.08 किमी लांबीचा असून तो रेल्वे विकास निगम लिमिटेड (RVNL) ने बांधला आहे. पूल विशेषतः ये-जा करण्यासाठी बांधण्यात आला आहे. या पुलामुळे आता वाहतूक सोपी झाली आहे.
-नवा पंबन पूल भारताच्या प्रगतीचे प्रतीक आहे.