आज जम्मू आणि काश्मीर विधानसभेत वक्फ दुरुस्ती कायद्यावरून मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नॅशनल कॉन्फरन्स वक्फ विधेयकावर चर्चा करण्याची मागणी करत आहेत.
अशातच आज सभागृहाचे कामकाज सुरू होताच, नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) नेते तन्वीर सादिक यांनी वक्फ कायद्याविरुद्ध स्थगन प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे आणि त्यामुळे त्यावर चर्चा करता येणार नाही, असे विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.
सभागृहात भाजपने प्रथम प्रश्नोत्तर सत्राची मागणी केली, तेव्हा नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी ‘वक्फ विधेयक स्वीकार्य नाही, ते परत घ्या’ अशा घोषणा देत सभागृहात गोधंळ घातला. याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. पंधरा मिनिटांनंतर पुन्हा कामकाज सुरू करण्यात आले.
#WATCH | Jammu: Ruckus in Jammu and Kashmir Assembly as NC (National Conference) MLAs protest against the Speaker for not allowing their adjournment motion on the Waqf Amendment Act
Speaker Abdul Rahim Rather said, "…I have seen the rules and as per Rule 58, no matter which is… pic.twitter.com/zXBnuCOugz
— ANI (@ANI) April 7, 2025
दरम्यान, वक्फ दुरुस्ती विधेयक २ एप्रिल रोजी लोकसभेत आणि ३ एप्रिल रोजी राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले होते. काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर वक्फ सुधारणा विधेयक आता अधिकृतपणे कायदा म्हणून समोर आला आहे.
हा नवा कायदा ‘वक्फ (सुधारणा) कायदा 2025’ या नावाने ओळखला जाईल, जो वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन, नोंदणी आणि सरकारी जमिनींवरील दावे याबाबत कठोर नियम लागू करतो.