‘आरएसएसमध्ये भारतातील सर्वांचं स्वागत आहे. पण प्रत्येकासाठी एक अट असणार ती म्हणजे शाखेत सामील होणाऱ्या प्रत्येकाला ‘भारत माता की जय’ ही घोषणा किंवा नारा देताना मनात कसलाही संकोच वाटता कामा नये. त्यांना भगव्या ध्वजाचा आदरही असला पाहिजे.’, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केलं आहे.
डॉ. मोहन भागवत यांनी ५ एप्रिल पासून वाराणसीच्या चार दिवसीय दौऱ्यावर आहेत. वाराणसीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी लाजपत नगर येथील शाखेला भेट दिली. येथे त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांना एका स्वयंसेवकाने, मुसलमान आरएसएसमध्ये (RSS) येऊ शकतात का? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर उत्तर देताना मोहन भागवत यांनी असं म्हंटल आहे.
या दौऱ्यावर त्यांनी एकतेचे देखील आवाहन केले आहे. ‘आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे अनेक लोक असले तरी आपली संस्कृती सारखीच आहे. जातीच्या बंधनातून उठून माळेप्रमाणे एकजूट व्हा. हिंदू समाजातील सर्व पंथ, जाती, समाज एकत्र आले पाहिजेत. ही संघाची दृष्टी आहे. संघाचा अर्थ सर्वांना मदत करणे आणि युवाशक्तीला योग्य दिशा देणे, असा आहे.’ असं त्यांनी म्हंटल आहे.