अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘टॅरिफ बॉम्ब’ फोडल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेने काही देशांवर टॅरिफ शुल्क लागू करण्याची घोषणा केल्यानंतर अनेक देशांचा शेअर बाजार कोसळला आहे. अमेरिका शेअर बाजारात देखील अशीच स्थित निर्माण झाली आहे.
ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बचा सर्वात जास्त धक्का बसला असेल तो तर म्हणजे ट्रम्प सरकारचे सल्लागार व मोठे उद्योगपती एलोन मस्क यांना. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे मस्क यांची संपत्ती अंदाजे १३५ अब्ज डॉलर्सने कमी झाली आहे.
ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे मस्क यांच्या कंपन्यांमध्ये मोठी घसरण झाल्याचे बोलले जाते. अशातच आता अशी बातमी येत आहे की, मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी गुप्तपणे बैठक करून टॅरिफ रद्द करण्याची विनंती केली आहे. मात्र, ट्रम्प यांनी त्यांच्या या विनंतीकडे दुर्लक्ष केले असल्याचे देखील बोलले जात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर ५० टक्के कर लादण्याची धमकी दिल्यानंतर, मस्क यांनी याचा जाहीरपणे विरोध केला आहे. व टॅरिफ शुल्क कमी करण्याचे आवाहन केले आहे. असे वृत्त अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन मधून देण्यात आले आहे.
ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे मस्क यांच्या कंपन्यांमध्ये मोठी घसरण झाल्याने एलोन मस्क यांनी स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी गुप्तपणे बोलून टॅरिफ रद्द करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, ट्रम्प यांनी त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले आहे. अशातच आता यामुळे ट्रम्प आणि मस्क यांच्यातील मैत्रीला तडा जाऊ शकतो. असे देखील बोलले जात आहे.