रामनवमीच्या दिवशी, ओडिशा-झारखंड सीमेवर असलेल्या केंदुझार जिल्ह्यात ख्रिश्चन मिशनऱ्यांनी सनातन धर्माविरुद्ध आक्षेपार्ह विधान करत आदिवासी लोकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी सात जणांना अटक झाली असल्याची देखील माहिती आहे.
केंदुझार जिल्ह्यात ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ख्रिश्चन मिशनऱ्यांनी हिंदूंविरुद्ध भडकावू भाषणं करत धर्मांतरणाचा प्रयत्न करत होते. याची माहिती मिळताच येथील हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी घाव घेतली. व धर्मोपदेश करणाऱ्या ख्रिश्चन प्रचारकांना पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणात पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतले असून, एकजण इथून पळून जाण्यास यशस्वी झाला. पोलीस याचा देखील शोध घेत असून, लवकरच याला ताब्यात घेतलं जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
आधीही घडलीत अशी प्रकरण
ओडिशा-झारखंड सीमेवर असलेल्या केंदुझार जिल्ह्यातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. याआधीही काही दिवसांपूर्वी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी भोळ्या आदिवासी लोकांचे धर्मांतर करण्याचे प्रयत्न करत होते. मात्र, याठिकाणच्या स्थानिक लोकांमध्ये संताप पाहून त्यांनी तेथून पळ काढला. या प्रकरणात पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पण आता पुन्हा असा प्रकार याठिकाणी घडला असून, पोलिसांनी कारवाई केली आहे.