देशातील गरजू लोकांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी केंद्र सरकार आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना चालवत आहे. या योजनेसाठी पात्र असलेले कोट्यवधी नागरिक सरकारच्या या सुविधेचा लाभ घेत आहेत. आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवून आणण्यासाठी मोदी सरकारने ही योजना आणली आहे.
आज या योजनेतून ८.५ कोटी रुग्णांनी केंद्र सरकारने नेमून दिलेल्या रुग्णालयांमधून उपचार घेतले आहेत. यापैकी ४.२ कोटी लोकांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतले व ४.३ कोटी रुग्णांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी नुकतीच लोकसभेत यासंबंधित माहिती दिली आहे.
याच आयुष्मान योजनेअंतर्गत, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण ‘आभा’ कार्डची सुविधा देखील देण्यात येते. आभा कार्ड हे आयुष्मान भारतचे डिजिटल हेल्थ कार्ड आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती डिजिटल पद्धतीने सेव्ह करू शकता.
भारतातील कोणताही नागरिक आभा कार्ड बनवू शकतो. हे कार्ड बनवल्यानंतर, तुम्हाला आधार कार्डसारखा १४-अंकी ओळख क्रमांक मिळतो. या कार्डमध्ये तुमच्या आरोग्याशी संबंधित संपूर्ण इतिहास सेव्ह करता येतो. जो तुम्ही PHR ऍपद्वारे ऍक्सेस करू शकता.
बँक खात्याप्रमाणे जशी तुम्हाला तुमच्या पैशांशी संबंधित माहिती मिळते, तशीच माहिती तुम्हाला तुमच्या अयोग्याबाबत आभा कार्डद्वारे एका क्लिकवर उपलब्ध होते. या कार्डमध्ये तुमच्या आरोग्याशी संबंधित सर्व डेटा सेव्ह केला जातो. याला सामान्यतः हेल्थ आयडी असेही म्हणतात.
भारतातील सर्व नागरिकांचा एक व्यापक डिजिटल आरोग्य रेकॉर्ड तयार करणे हे आभा कार्डचे उद्दिष्ट आहे. तसेच, आरोग्य क्षेत्रात कार्यक्षमता आणि जबाबदारी वाढवण्यासाठी देखील महत्वाचे मानले जात आहे.
ABHA कार्डचे फायदे जाणून घेऊया….
-तुम्ही तुमचे सर्व वैद्यकीय रेकॉर्ड या डिजिटल कार्डमध्ये सेव्ह करू शकता.
-तुमच्या उपचारांशी संबंधित कागदपत्रे यात तुम्ही सुरक्षितपणे सेव्ह करू शकता.
-या कार्डच्या मदतीने, तुम्ही तुमच्या आजारपणात कोणते औषध घेतले आहे हे ५-१० वर्षांनंतरही कळू शकते.
-तुमचे सर्व पॅथॉलॉजी रिपोर्ट, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आणि औषधांचे रेकॉर्ड डिजिटल पद्धतीने यात सुरक्षित ठेवता येतात.
-तुमच्या हेल्थ आयडीद्वारे तुमचा आरोग्य इतिहास पाहिल्यानंतर डॉक्टर योग्य ते उपचार देण्यास सक्षम असतात.
-या कार्डच्या मदतीने तुम्ही PHR ऍपद्वारे तुमचे वैद्यकीय रेकॉर्ड ऍक्सेस करू शकता.
-तुम्ही या कार्डमध्ये आरोग्य विमा पॉलिसी देखील जोडू शकता.
-विशेष म्हणजे यात अपलोड केलेले सर्व वैद्यकीय रेकॉर्ड पूर्णपणे सुरक्षित राहतात. व तुमच्या परवानगीशिवाय कोणीही ते पाहू शकत नाही.
ABHA कार्ड कसे बनवायचे?
ABHA कार्ड बनवण्यासाठी, तुम्ही आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ मिशनची वेबसाइट किंवा मग मोबाइल ऍप दखल वापरू शकता.
-सर्वप्रथम तुम्हाला आयुष्मान भारत डिजिटल मिशनची अधिकृत वेबसाइट ‘tps://ndhm.gov.in/’ ला भेट द्यावी लागेल.
-होमपेजवर तुम्हाला ‘आभा नंबर तयार करा’ हा पर्याय दिसेल. तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल.
-नवीन पेज उघडल्यावर तुम्हाला दोन पर्याय दिसतील: आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स.
-कोणताही एक पर्याय निवडा आणि नंतर पुढील बटणावर क्लिक करा.
-यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक विचारला जाईल. त्यावर क्लिक करा आणि खाली दिलेला कॅप्चा कोड प्रविष्ट करा. यानंतर ते सबमिट करा.
-त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल. ओटीपी भरल्यानंतर एक फॉर्म उघडेल. तो फॉर्म भरा.
-यानंतर, My Account पर्यायावर जा आणि फोटो अपलोड करा.
-सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमचे आभा कार्ड मिळेल.
याशिवाय तुम्हाला ABHA कार्डद्वारे आणखी बरेच फायदे मिळू शकतात.