आयपीएल टीम २०२५ मधील पंजाब किंग्जचा फलंदाज प्रियांश आर्यने मोठी कामगिरी करत इतिहास रचला आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या या अनकॅप्ड फलंदाजाने फक्त ३९ चेंडूत शतक झळकावले आहे. प्रियांशच्या याच चमकदार कामगिरीचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे.
प्रियांशने ३९ चेंडूत शतक झळकावत आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. याशिवाय, त्याचे ३९ चेंडूतील शतक हे कॅप्ड आणि अनकॅप्ड फलंदाजांमध्ये संयुक्तपणे चौथे सर्वात जलद शतक आहे.
आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. ज्याने पुण्याविरुद्ध ३० चेंडूत शतक ठोकले होते. यानंतर यादीत युसूफ पठाण आहे. युसूफ पठाणने ३७ चेंडूत शतक झळकावले.
आयपीएलमधील सर्वात जलद शतक (चेंडूंच्या बाबतीत)
३० – ख्रिस गेल (आरसीबी) विरुद्ध पीडब्ल्यूआय, बेंगळुरू, २०१३
३७ – युसूफ पठाण (आरआर) विरुद्ध एमआय, मुंबई बीएस, २०१०
३८ – डेव्हिड मिलर (किंग्ज इलेव्हन पंजाब) विरुद्ध आरसीबी, मोहाली, २०१३
३९ – ट्रॅव्हिस हेड (SRH) विरुद्ध आरसीबी, बेंगळुरू, २०२४
३९ – प्रियांश आर्य (पीबीकेएस) वि सीएसके, मुल्लापूर, २०२५*
या कामगिरीसह प्रियांश आयपीएलमध्ये शतक करणारा सातवा अनकॅप्ड फलंदाज आहे. हा विक्रम प्रथम शॉन मार्शने केला आहे. त्याने लीगच्या पहिल्याच हंगामात शतक झळकावले. तर भारतीय फलंदाजांमध्ये मनीष पांडे याचेही नाव आहे.
नॉनकॅप्ड खेळाडूंनी केलेले आयपीएल शतके
शॉन मार्श, २००८
मनीष पांडे, २००९
पॉल वल्थती, २००९
देवदत्त पडिक्कल, २०२१
रजत पाटीदार, २०२२
यशस्वी जयस्वाल, २०२२
प्रभसिमरन सिंग, २०२३
प्रियांश आर्य, २०२५