काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील उपस्थित होते. काल पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रा नऊ महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
याशिवाय राज्यातील प्रशासकीय विभागातही मोठे बदल करण्यात आले आहेत. राज्य सरकारने ५ वरिष्ठ बड्याIAS अधिकाऱ्यांची बदली जाहीर केली आहे.
यामध्ये आयएएस अभिनव गोयल हे आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे काम पाहणार आहेत. त्यांची कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गोयल हे सध्या हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते. आता ते कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. हिंगोलीत त्यांनी आपल्या चांगल्या कामाची छाप सोडली असून कल्याण डोंबिवली कल्याण डोंबिवली महापालिकेतही ते असेच कार्यरत राहतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र सरकारकडून ‘या’ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
-आयएएस अभिनव गोयल हे सध्या हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते. पण त्यांची नियुक्ती आता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयु्क्तपदी करण्यात आली आहे.
-आयएएस सी. के. डांगे यांची मुंबईत महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
-आयएएस संजय काटकर यांची मुंबईत महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
-आयएएस अनीता मेश्राम यांची बदली अकोला येथील जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत होत्या.
-आयएएस आयुषी सिंह यांची नागपूर येथे अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.