Devendra Fadnvis: गेल्या काही दिवसांपासून वक्फ बोर्ड विधेयकावरू राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. अर्थातच या विधेयकावरू सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण पाहायला मिळाले. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच वक्फ बोर्डाच्या आडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील प्रचंड जमीन लाटली असल्याचा आरोप केला आहे. तसेच फडणवीसांनी या नेत्यांवर कारवाई करण्याचा इशार देखील दिला आहे.
खरेतर फडणवीस यांनी केलेल्या या आरोपांत तथ्य आहे, असे अनेकांचे मत आहे. कारण काही वर्षांपूर्वी वक्फ बोर्डाच्या जमिनीचा हिशोब लावण्यासाठी महाराष्ट्र राज्याने ‘अटक शेख समिती स्थापन’ केली होती. या समितीने 2015 मध्ये आपला अहवाल सादर केला होता.
अटक शेख समितीतील काही प्रमुख निष्कर्ष आणि शिफारशी पुढीलप्रमाणे होत्याा
-मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार: समितीने वक्फ जमिनींच्या व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि अनियमितता असल्याचे निदर्शनास आणले. यामध्ये जमिनींचे बेकायदेशीर हस्तांतरण, भाडेपट्ट्यांमध्ये अनियमितता आणि इतर आर्थिक गैरव्यवहारांचा समावेश होता.
-राजकीय हस्तक्षेप: अहवालात असा आरोप करण्यात आला होता की काही राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वक्फ जमिनींच्या गैरव्यवहारात मदत केली किंवा त्याकडे दुर्लक्ष केले, यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचा उल्लेख होता.
-जमिनींचा गैरवापर: अनेक वक्फ जमिनी मूळ उद्देशाऐवजी इतर व्यावसायिक किंवा वैयक्तिक कारणांसाठी वापरल्या जात असल्याचे समितीने नमूद केले.
-अव्यवस्थित नोंदी: वक्फ मालमत्तेच्या नोंदी व्यवस्थित ठेवल्या गेल्या नसल्याचे आणि अनेक जमिनींची मालकी स्पष्ट नसल्याचे अहवालात म्हटले होते.
-समितीने अनेक महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या होत्या, त्यामध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
-बेकायदेशीरपणे हस्तांतरित झालेल्या जमिनी परत मिळवण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी.
-वक्फ मालमत्तेची अचूक नोंदणी आणि नियमित ऑडिट करण्याची व्यवस्था करावी.
-वक्फ बोर्डाच्या प्रशासनात सुधारणा करावी आणि अधिक पारदर्शकता आणावी.
-जमिनींच्या भाडेपट्ट्यासंबंधीचे नियम अधिक कठोर करावे.
-अटक शेख समितीचा हा अहवाल त्या वेळी चांगलाच गाजला आणि यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही तापले होते. या अहवालातील निष्कर्षांवर आणि शिफारसींवर बरीच चर्चा झाली आणि काही प्रमाणात कारवाई देखील झाली.
दरम्यान, वक्फ विधेयकाला काँग्रेस नेत्यांनी जो कडवट विरोध केला त्या मागे ही लाटालाटी होती की काय असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांना भीती असावी वर्षोनुवर्षे त्यांनी वक्फ बोर्डाच्या बुरख्या आडून केलेली जमीनीची लूट आता बाहेर येईल, अशा देखील चर्चा रंगताना दिसत आहे.