Tahawwur Rana: भारतावर झालेल्या आतापर्यंतच्या सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी एक असलेल्या 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील मुख्य मास्टरमाइंड तहव्वूर राणाला अखेर 10 एप्रिल रोजीभारतात आणण्यात आले आहे. त्यानंतर त्याला एनआयएच्या मुख्यालयात नेऊन त्याची अधिकृत चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली होती.
अखेर आज पहाटे अडीच वाजताच्या सुमारास तहव्वूर राणाला घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांचा ताफा दाखल झाला होता. त्यानंतर विशेष एनआयए कोर्ट न्यायाधीश चंदेर जित सिंह यांनी तहाव्वुर राणाला 18 दिवसांची कोठडी सुनावली आहे. आता कसाबप्रमाणे तहव्वुरला देखील फाशीचीच शिक्षा व्हावी अशी भावना अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
तहवूर राणाला भारतात आणल्यानंतर अमेरीकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता टॅमी ब्रूस यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, “आम्हाला या गतिशीलतेचा अभिमान आहे.भारत आणि अमेरिका दहशतवादाचा सामना करण्यासाठी कटिबद्द आहे”. तर युनायटेड स्टेट्सने या हल्ल्यांसाठी जबाबदार असणाऱ्यांना न्यायाच्या कक्षेत आणण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना नेहमीच पाठिंबा दिला आहे,असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
दरम्यान, 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेविड कॉलमेन हेडलीशी त्याचा संबंध असल्याचे मानले जाते. म्हणून भारत दीर्घकाळापासून त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी करत होता. आता त्याला काय शिक्षा केली जाणार, 3याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.