अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी विविध देशांवर आयात वस्तूंवर अतिरिक्त कर (टॅरिफ) लावण्याचा निर्णय घेतला होता. यात भारताचाही समावेश होता, आणि भारतावर २६ टक्के आयात कर लावण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये घबराट पसरली होती.मात्र, आता ट्रम्प यांनी थोडा दिलासा दिला आहे. त्यांनी भारतासह काही देशांवरील हा अतिरिक्त कर ९० दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच, ९ जुलैपर्यंत हा जादा कर लागणार नाही. याचा थेट फायदा भारतीय शेअर बाजाराला झाला आहे.
या बातमीनंतर गुंतवणूकदारांनी बाजारात मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले आणि त्यामुळे शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. यामध्ये सेन्सेक्स १३५३ अंकांनी वधारून ७५,२०० च्या वर गेला.तर निफ्टी देखील ४४३ अंकांनी वाढून २२,८४२ वर पोहोचला आहे.
कोणते शेअर्स वधारले आणि कोणते घसरले?
वाढलेले शेअर्स/सेक्टर:
फार्मा सेक्टर: सर्वाधिक वाढ – ३.०२%
मेटल, हेल्थकेअर, मीडिया, कंझ्युमर ड्युरेबल्स, आयटी, रिअल इस्टेट, फायनान्शियल सर्व्हिसेस या सगळ्यांमध्ये चांगली वाढ झाली.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये देखील चांगली तेजी पाहायला मिळाली.
घसरलेले शेअर्स:
एशियन पेंट्स: सर्वाधिक घसरण – १.१०%
नेस्ले इंडिया आणि टीसीएस: थोडीशी घसरण
आता महत्वाची गोष्ट गोष्ट अशी की अमेरिकेने दिलेली ही सवलत चीन, हाँगकाँग आणि मकाऊसाठी लागू नाही. तसेच, अमेरिका अजूनही १०% मूळ कर लागू ठेवणार आहे. कारण तसे व्हाईट हाऊसच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.