‘एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून, बाकी सगळे कांदा लावत सुटतात, कांद्याची लागवड किती करावी यालाही मर्यादा आहे, दुप्पट तिप्पट ठीक पण पन्नास पटीने कांद्याची लागवड करायला लागले, तर कांद्याचे बाजारभाव पडणारच’ असं वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा वाद पेटणार असल्याचं चित्र आहे.
खरं तर कोकाटे यांचं शेतकऱ्यांबाबतच हे पाहिलं व्यक्तव्य नाही तर याआधी देखील त्यांनी असेच वक्तव्य केले आहेत. ज्यामुळे ते अनेकवेळा वादात सापडले आहेत. नुकतंच त्यांनी कर्जमाफीवर एक विधान केलं होत. ‘शेतकरी दोन -चारा वर्ष कर्जमाफीची वाट पाहातात, कर्जमाफीच्या आलेल्या पैशांमधून लग्न आणि साखरपुडा करतात.’ त्यांच्या या वक्तव्यामुळे देखील राज्यात वाद पेटला होता.
त्यांच्या या बेजबाबदार व्यक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी देखील त्यांना खडेबोल सुनावले होते. त्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना ‘एकदा-दोनदा चूक झाली तर समजून घेऊ, मात्र तिसऱ्या वेळी चूक केल्यास माफी नाही, तर मंत्रिपद बदलू’, असा थेट इशारा दिला होता. मात्र, अजित पवारांच्या इशाऱ्यानंतरही त्यांची अशी वक्तव्य थांबण्याची नाव घेत नाहीयेत.
कोकाटेंची आतापर्यंतची वादग्रस्त वक्तव्य?
-‘कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक करता का? कर्जमाफीचे पैसे तुम्ही सारखपुडा आणि लग्न कार्यासाठी वापरता.’
-“हल्ली भिखारी सुद्धा एक रुपया घेत नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना देत आहे. पण या योजनेलाही गैरव्यवहाराचे ग्रहण लागले आहे. योजना बंद करायची नाही. पण सुधारणा कराव्या लागतील”, त्यांच्या या वक्तव्यावरुनही राज्यात वाद पाह्यला मिळाला होता.