उद्या देशरात हनुमान जयंती मोठ्या उत्सवात साजरी होणार आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. अनेक ठिकाणी मिरवणुका देखील काढण्यात येणार आहेत. याचदरम्यान, कोलकाता उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाने शहरातील इंदिरा गांधी सरणी येथे हनुमान जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यासाठी हिंदू संघटनांना परवानगी नाकारली आहे. न्यायमूर्ती तीर्थंकर घोष यांच्या एकल खंडपीठाने मिरवणुकीमुळे वाहतुकीवर परिणाम होत असल्याचे कारण देत मिरवणुकीला परवानगी नाकारली आहे. हिंदू सेवा संघटनाने मंगळवारी (८ एप्रिल २०२५) परवानगीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
https://twitter.com/ANI/status/1910611365594546517
कलकत्ता उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाची परवानगी न मिळाल्याने हिंदू सेवा संघटनाने या निर्णयाला दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंदू संघटनांनी मिरवणुकीसाठी पोलिसांना अर्ज सादर केला होता, परंतु पोलिसांनी या अर्जावर कोणतेही उत्तर दिले नाही. यानंतर, हिंदू संघटनांनी १२ एप्रिल रोजी हनुमान जयंतीला मिरवणूक काढण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यावर न्यायालयाकडून निर्णय देण्यात आले आहे.