वक्फ सुधारणा कायदा २०२५ देशभरात लागू करण्यात आला आहे. हा कायदा देशात ८ एप्रिलपासून २०२५ पासून लागू झाला आहे. वक्फ बोर्डाच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी हे विधेयक २ एप्रिल रोजी लोकसभेत सादर करण्यात आले. या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये दीर्घ चर्चेनंतर हे विधेयक मजूर करण्यात आले. मात्र, असे असतानाही विरोधक या विधेयकाला आता विरोध करत आहेत.
देशातील अनेक भागात या विधेयकाविरोधात आंदोलन झाली आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमधून या विधेयका मोठा विरोध होत आहे. या विरोधात येथे अनेक ठिकाणी आंदोलन झाली आहेत. आता येथील आंदोलन हिंसक वळण घेताना दिसत आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर ‘वक्फ सुधारणा कायदा पश्चिम बंगालमध्ये लागू केला जाणार नाही.’ अशी घोषणा केली आहे. या विधेयकाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदानात उतरला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा असलेल्या मुस्लीम राष्ट्रीय मंचाकडून या विधेयकाबाबत जनजागृती अभियान राबण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे अखिल भारतीय संयोजक विराग पाचपोर यांनी एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.
या अभियानाअंतर्गत काय काम केले जाणार?
जनजागृती अभियाना अंतर्गत या कायद्याबाबत मुस्लिम समाजाला माहिती देण्यात येणार आहे. या कायद्यामुळे कुठलेही नुकसान होणार नसून त्यांच्या मशिदी, त्यांच्या इमारती, त्यांचे कब्रस्तान कुणी हिरावून घेणार नाही, हे स्पष्टपणे समाजात सर्वांना कळले पाहिजे. म्हणून ही मोहीम राबण्यात येणार आहे.
काही कट्टरपंथी लोक मुस्लिम समाजात गैरसमजुती पसरवून भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. या अभियानाद्वारे वक्फ सुधारणा कायदा सामान्य मुस्लिमांच्या कसा हिताचा आहे हे तथ्यांच्या आधारे समजावून सांगण्यात येणार आहे.