महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने पॅरिस ऑलिंपिकमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीनंतर हरियाणा सरकाकडून एक मोठी घोषणा करण्यात आली होती. हरियाणा सरकाकडून विनेशला सन्मान निधी म्हणून ४ कोटी रुपये देणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण विनेश फोगाट सरकाराच्या या सन्मान निधीवर खूष नसल्याचे समजते आहे.
विनेशने राज्य सरकारकडून आणखी एकाफ्लॅटची मागणी केली असल्याचे समजत आहे. विनेशच्या या मागणीमुळे ती आता चांगलीच चर्चेत आली आहे.
गेल्या महिन्यात हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी विनेशसमोर रोख बक्षीस, निवासी भूखंड आणि सरकारी नोकरीचा पर्याय ठेवला होता. पण विनेश आता आमदार असल्याने ती सरकारी नोकरीच पर्याय निवडू शकत नव्हती. म्हणूनच तिने इतर दोन पर्याय निवडले.
राज्य सरकारच्या क्रीडा धोरणानुसार, ऑलिंपिक पदक विजेत्या खेळाडूला पैसे, सरकारी नोकरी आणि निवासी भूखंड यापैकी एक गोष्ट देण्याची तरतूद आहे. याअंतर्गत, सरकारी मंत्रिमंडळाने विनेश समोर हे तीन पर्याय ठेवले व तिला एक पर्याय निवडण्यास सांगितले. मात्र, तिने यातील दोन पर्याय निवडले आणि रोख बक्षीससह जमिनीची देखील मागणी केली असल्याचं एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. अशातच आता सरकराकडून तिला कोणत्या गोष्टी बक्षीस म्हणून देण्यात येतात हे पाहणे महत्वाचे ठरले.
कुस्तीपटू विनेशच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर तिने ५० किलो महिला वजनी गटात अंतिम सामन्यात प्रवेश केला होता, पण अंतिम क्षणी आवश्यक वजनाहून १०० ग्रॅम वजन अधिक भरल्याने तिला बाद करण्यात आले. यामुळे तिला अंतिम सामना न खेळताच बाद केले गेले.
अशास्थितीत पॅरिस ऑलिंपिकमध्ये विनेश रौप्य पदक जिंकण्यापासून वंचित राहिली होती. त्या काळात, मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी सोशल मीडियावर लिहिले होते की, ‘विनेश हरियाणाची मुलगी आहे. तिची कामगिरी ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्याच्या बरोबरीची मानली जाईल.’