Naxalite News: छत्तीसगड-महाराष्ट्र सीमावर्ती भागातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील नक्षलग्रस्त भाग म्ह्णून ओळखल्या जाणाऱ्या विजापूर भागात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार चकमक झाली आहे. या चकमकीत दोन्ही बाजूने एकमेकांवर मोठ्या प्रमाणात गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या चकमकीत तीन माओवाद्यांना कंठस्नान घाण्यात आले आहे.
इंद्रावती नदीच्या आसपास असणाऱ्या जंगल परिसरात नक्षलवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाना प्राप्त झाली होती. त्यानुसार सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. त्यानंतर १२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्याच्या सुमारास सुरक्षा दले अन् नक्षलवादी यांच्यात चकमक झाली होती. त्यानंतर या सर्च ऑपरेशनमध्ये २ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे.
या चकमकीनंतर पोलिसांनी माओवाद्यांचा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व स्फोटक पदार्थ जप्त केले आहेत. पोलिसांच्या डीआरजी, एसटीएफ कोब्रा अशा तीन बटालियनने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. खरेतर इंद्रावती नॅशनल पार्क भागात अगोदरही मोठ्या संख्येत पोलिसांनी माओवाद्यांना ठार केले होते.
दरम्यान, छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यात माओवाघांनी 11 एप्रिल रोजी लावलेले तीन भुसुरंग स्फोटांचा पोलिसांनी शोध लावला होता. तीन दिवसांअगोदर माओवादी संघटनेने पत्र काढून पहाडीवर मोठ्या प्रमाणात ईडी स्फोटक लावल्याची सूचना गावकऱ्यांना दिली होती. याच स्फोटांचा शोध अखेर कोब्रा बटालियन व छत्तीसगड पोलिसांनी लावला होता. ही सर्व स्फोटके नंतर पोलिसांनी निकामी केली होती. यातील दोन भूसुरंग निकामी करताना पोलिसांनी तब्बल चार तास कसरत करावी लागली होती.