गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवैध बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा चर्चेत आला आहे. राज्यातील अनेक भागात अवैधरित्या राहणारे बांगलादेशी सापडले आहेत. ही घुसखोरी रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली असून, याअंतर्गत अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना पकडले जात आहे. राज्य पोलिसांना या कारवाईत अनेक बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात यश आले आहे.
गंभीर बाब म्हणजे या पकडलेल्या बांगलादेशी घुसखोरांकडून बनावट प्रमाणपत्र सापडली आहेत. त्यामुळे हा मुद्दा चिंतेचा विषय ठरला आहे. याचदरम्यान बीड जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बीड जिल्ह्यात बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा
बीड येथे गुन्हा/FIR क्र. 209 दाखल
इकबाल मुन्शी कुरेशी, फेमुन्निसा बेगम मैनोदीन शेख… एकूण 50 लोकांवर, भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम 420, 468, 471 गुन्हा दाखल
बनावटी दस्तावेज द्वारा जन्म प्रमाणपत्र मिळविले भाजपा डॉ किरीट सोमैया यांच्या… pic.twitter.com/NoP9IbaXIz
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 12, 2025
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. किरीट सोमय्या यांनी फक्त बीड जिल्ह्यातील प्रकार समोर आणला असून, जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी गेल्या दोन महिन्यात १८ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
किरीट सोमया यांनी बीड येथे बनावटी दस्तावेजद्वारा जन्म प्रमाणपत्र मिळविले असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकणाची चौकशी करण्यात आली. दरम्यान, आता इकबाल मुन्शी कुरेशी, फेमुन्निसा बेगम मैनोदीन शेख यांच्यासह एकूण ५० लोकांवर भारतीय दंड संहिता अंतर्गत कलम ४२०, ४६८, ४७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.