Russia Ukraine War: एकीकडे रशिया-युक्रेन युद्धाला पुर्णविराम मिळाल्याच्या चर्चा सुरू असताना आता दुसरीकडे रशियाने युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला केला आहे. १३ एप्रिल रोजी रशियाने युक्रेनच्या ईशान्येकडील सुमी शहरावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला केलाआहे. या हल्ल्यात ३१ नागरिकांचा मृत्यू झाला असून ८० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. युक्रेनच्या आपत्कालीन सेवा विभागाने ही माहिती दिली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ‘पाम संडे’ म्हणजे ख्रिस्ती धर्मियांचा महत्त्वाचा दिवस साजरा करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरलेले असताना तसेच सार्वजनिक वाहतूक आणि इमारतींमध्ये असताना सकाळी सुमारे१० वाजून १५ मिनिटांनी शहराच्या मध्यवर्ती भागात दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे कोसळली. या हल्ल्यामुळे अनेक इमारती आणि वाहने जळून खाक झाली आहेत.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, ‘सामान्य नागरिकांचे जीव घेणारे हे केवळ नीच कृत्य आहे. ज्या दिवशी लोक चर्चमध्ये जातात, त्याच दिवशी हल्ला करणे हे राक्षसीपणाचे लक्षण आहे. त्यांनी मित्र राष्ट्रांकडून रशियावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, सुमीचे कार्यवाहक महापौर आर्टेम कोबझार यांनी सांगितले की मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण बचाव कार्य अजूनही सुरू आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांना योग्य उपचार मिळत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेऊन