आज १४ एप्रिल २०२५ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार आणि फुले अर्पण करुन अभिवादन करण्यात येते आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संसद भवनातील प्रेरणा स्थळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. त्यांच्यासह उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, किरेन रिजिजू, अर्जुन राम मेघवाल आणि पियुष गोयल यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी प्रेरणा स्थळाला भेट दिली आहे.
सभी देशवासियों की ओर से भारत रत्न पूज्य बाबासाहेब को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन। यह उन्हीं की प्रेरणा है कि देश आज सामाजिक न्याय के सपने को साकार करने में समर्पित भाव से जुटा हुआ है। उनके सिद्धांत एवं आदर्श आत्मनिर्भर और विकसित भारत के निर्माण को मजबूती और गति देने वाले हैं। pic.twitter.com/Qhshv4uK7M
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2025
पंतप्रधान मोदी आपल्या एक्स (X) वरील पोस्टमध्ये म्हणाले आहेत की, ‘आंबेडकरांचे विचार आणि आदर्श आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या निर्मितीला बळ देतील.’ सर्व देशवासियांच्या वतीने, मी भारतरत्न पूज्य बाबासाहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त नमन करतो. त्यांच्या प्रेरणेमुळेच आज देश सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार करण्यासाठी समर्पित आहे. त्यांचे विचार आणि आदर्श ‘आत्मनिर्भर’ आणि ‘विकसित’ भारताच्या निर्मितीला शक्ती आणि गती देतील,” असे पंतप्रधान म्हणाले आहेत.
https://twitter.com/AmitShah/status/1911594196743381229
दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या एक्स (X)वरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘शिक्षण, समानता आणि न्यायाच्या आधारावर सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे बाबासाहेब भीमराव आंबेडकर आयुष्यभर वंचितांच्या हक्कांसाठी वचनबद्ध राहिले. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या तत्वांवर आधारित संविधान तयार करून त्यांनी भारताच्या महान लोकशाही वारशाचा मजबूत पाया रचला. न्याय आणि समतावादी समाज निर्माण करण्याच्या दिशेने बाबासाहेबांचे विचार आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देतात. संविधानाचे महान शिल्पकार आणि कोट्यवधी देशवासीयांच्या स्वाभिमानाचे प्रतीक, बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.’
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीच्या वरिष्ठ मंत्र्यांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीला भेट देऊन अभिवादन केलं आहे.
जगातील सर्वोत्तम संविधानाची निर्मिती करून न्याय आणि समतेचे दीप प्रज्वलित करणाऱ्या महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!#Maharashtra #DrBabaSahebAmbedkar #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर pic.twitter.com/6qSKBOSalL
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 14, 2025
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट केलं आहे की, ‘जगातील सर्वोत्तम संविधानाची निर्मिती करून न्याय आणि समतेचे दीप प्रज्वलित करणाऱ्या महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!