Raj Thckeray: आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहिली आहे मात्र या पोस्टमध्ये त्यांनी मुंबईतील मराठी माणसाच्या दुय्यम दर्जाच्या मुद्द्यावरही भाष्य केले आहे, त्यामुळे या पोस्टवरून विविध चर्चांणा उधाण आले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आज पुन्हा एकदा मुंबईत मराठी भाषेला, मराठी माणसाला दुय्यम दर्जा दिला जात असताना, या लढ्यासाठी किती उत्तुंग माणसांनी आपली शक्ती खर्ची केली होती, हे मराठी माणसाने विसरू नये. आणि हे जर आपण विसरलो आणि मराठी म्हणून एकत्र नाही आलो तर या लढ्याला काय अर्थ? .”
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची आज जयंती. आज या जयंतीनिमीत्त संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला बाबासाहेबांनी या लढ्याला कसा पाठींबा दिला होता आणि इतकंच नाही तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र नको म्हणून जे काही तर्क पुढे केले जात होते त्याला… pic.twitter.com/CiFzSYDRu6
— Raj Thackeray (@RajThackeray) April 14, 2025
राज ठाकरे यांनी थेट कोणावरही आरोप केला नसला तरी, त्यांच्या या पोस्टमधील ‘मुंबईतील मराठी माणसाला दुय्यम दर्जा’ या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आणि समाज माध्यमांवर विविध चर्चा रंगल्या आहेत. अनेक मनसे कार्यकर्त्यांनी आणि मराठी भाषिक नागरिकांनी या पोस्टला समर्थन दर्शवले आहे, तर काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या एका प्रवक्त्याने म्हटले आहे की, “मुंबई ही सर्वांची आहे आणि येथे कोणालाही दुय्यम दर्जा दिला जात नाही. राज ठाकरे यांनी उगाच समाजात गैरसमज पसरवू नये.” दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन करत मुंबईतील मराठी भाषिकांच्या समस्या आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायावर आवाज उठवण्याची गरज व्यक्त केली आहे.