Mumbai Indiance: यंदाच्या आयपीएलच्या हंगामात मुंबई इंडिन्सकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी होताना दिसत नाही. त्यामुळे मुंबई इंडिनन्सचे चाहते नाराज आहेत. त्यातच मुंबई इंडियन्स संघाच्या मालक नीता अंबानी या आज शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी गेल्या असताना, तेथे जमलेल्या काही चाहत्यांनी त्यांना घेरले आणि रोहित शर्माला पुन्हा कर्णधार करण्याची मागणी केली. तसेच मुंबई इंडियन्सच्या निराशाजनक कामगिरीबद्दल चाहत्यांनी आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे.
एका चाहत्याने तर हात जोडत नीता अंबानी यांना म्हटले की, रोहित शर्माला कॅप्टन बनवा. यावर नीता अंबानी यांनी स्मितहास्य करत उत्तर दिले, “बाबा की मर्जी.” त्यांच्या या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे तो काही चाहत्यांना रुचलेला दिसत नाही. कारण रोहित शर्माने यापूर्वी मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे. मात्र, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली यावर्षी संघाची कामगिरी चांगली नसून खेळलेल्या सहा सामन्यांपैकी केवळ दोनच सामने ते जिंकू शकले आहेत.
काही सामन्यांमध्ये हार्दिक पांड्याने घेतलेल्या निर्णयांवर चाहते समाधानी दिसत नाहीत. क्षेत्ररक्षण बदल आणि गोलंदाजीच्या क्रमात केलेले बदल काहीवेळा संघासाठी फायदेशीर ठरले नाहीत, असे चाहत्यांना वाटते. तसेत अनेकांना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वामध्ये आक्रमकतेचा अभाव जाणवतो, जो रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये दिसून येत होता.
मात्र, रोहित शर्माची वैयक्तिक कामगिरीही यावर्षी फारशी चांगली राहिलेली नाही. त्याने पाच सामन्यांत केवळ ५६ धावा केल्या आहेत. परंतु रोहित शर्माच्या कर्णधार पदाच्या अनुभवामुळे अनेकजण त्याला कर्णधार बनवण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.
दरम्यान, नीता अंबानी यांनी चाहत्यांच्या या मागणीला थेट नकार दिला नसला, तरी त्यांचे ‘बाबा की मर्जी’ हे उत्तर सध्या चर्चेचा विषय बनले आहे. आता संघ व्यवस्थापन चाहत्यांच्या भावनांचा आदर करत काही बदल करणार का, याकडे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.