सध्या अमेरिका आणि चीन यांच्यात ट्रॅफिक कर (आयात शुल्क) आकारण्यावरून युद्ध सुरु आहे. अमेरिकेने नुकतीच सर्व देशांवर टॅरिफ कर लावण्याची घोषणा केली आहे. यामध्ये अमेरिकेने चीनवर सर्वात जास्त टॅरिफ कर लावला आहे. अमेरिकेच्या याच निर्णयाचा विरोध चीन गेल्या काही दिवसांपासून करत आहे. व अमेरिकेविरुद्ध अनेक पाऊल उचलत अमेरिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण चीन आता अमेरिकेसमोर झुकली असून, टॅरिफ कर रद्द करण्याची मागणी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने रविवारी अमेरिकेला टॅरिफ शुल्क पूर्णपणे रद्द करण्याचे आवाहन केले आहे. एक निवेदन सादर करत चीनने म्हंटले आहे की, ‘अमेरिकाने आपली चूक सुधारावी आणि रेसिप्रोकल टॅरिफ माघारी घ्यावे. चुकीच्या पद्धतीने वाढवलेला टॅरिफ कर पूर्णपणे रद्द करा. व परस्पर आदराच्या मार्गावर परत या.’ असं निवेदन सादर करत चीनने टॅरिफ कर पूर्णपणे रद्द करण्याची मागणी केली आहे.
पुढे चीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्ताने सांगितले की, ‘वाघाच्या गळ्यात ज्याने घंटी बांधली आहे, तोच ती काढू शकतो. डोनाल्ड ट्रॅम्पच टॅरिफ वॉर संपवू शकतात.’
अमेरिकेने चीनच्या सामानांवर अजूनही 145 टक्के टॅरिफ कर लादला आहे. त्यानंतर चीनने शुक्रवारी अमेरिकेवर लावण्यात आलेला टॅरिफ कर 84 टक्के वरून 125 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.
दरम्यान, ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाविरोधात इतर देशांनी एकत्र येत आवाज उठवण्याचे आवाहन चीनने केले आहे.