सध्या आयपीएल २०२५ चा हंगाम चांगलाच तापत चालला आहे. क्रिकेटप्रेमींचा उत्साह आता शिगेला पोहचला आहे. दरम्यान, काल चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स या टीममध्ये झालेल्या सामन्यात चेन्नईचा विजय झाला आहे. त्यामुळे चेन्नई टीमचे चाहते चांगलेच खूष झालेले दिसत आहेत.
चेन्नई सलग पाच पराभवांनंतर कालच्या सामन्यात विजयी झाली आहे. अशातच निराश झालेल्या चाहत्यांमध्ये पुन्हा उत्साह वाढला असल्याचे दिसत आहे. आहे. सोमवारी लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नईने लखनौचा ५ विकेट्सने पराभव केला आहे.
🦁💛🥳#LSGvCSK #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/j93g9U2StB
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 14, 2025
चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत लखनौला ७ बाद १६६ धावांवर रोखले आणि नंतर तीन चेंडू शिल्लक असताना ५ विकेट राखून चेन्नई संघाने लक्ष्य गाठले. चेन्नईने या हंगामात खेळलेल्या सात सामन्यांतील हा दुसरा विजय आहे.
चेन्नईच्या विजयात शिवम दुबेचे मोठे योगदान आहे. त्याने लखनौविरुद्ध नाबाद ४३ धावा केल्या आहेत. तर कर्णधार एमएस धोनीने नाबाद २६ धावा केल्या आहेत. दोघांनीही सहाव्या विकेटसाठी २८ चेंडूत ५७ धावांची नाबाद भागीदारी केली. ज्यामुळे चेन्नईचा विजयी मार्ग सोपा झाला.