केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोलनाक्यांबाबत मोठी माहिती दिली आहे. देशात टोलनाके राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. टोलनाक्यांमुळे आता कोणालाही त्रास होणार नसल्याचं देखील त्यांनी म्हंटल आहे. गडकरी, दादरच्या अमर हिंद मंडळाच्या वसंत व्याख्येनमालेत बोलत होते तेव्हा त्यांनी टोलनाक्यांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
टोलनाक्यांबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, ‘येत्या १५ दिवसांच्या आत अशी पॉलिसी येईल की टोलबद्दल तुमची कोणतीही तक्रार असणार नाही. पण मी महाराष्ट्रातील टोलबद्दल बोलत नाहीय. राष्ट्रीय महामार्गांबाबत बोलत आहे. केंद्र सरकार सध्या सॅटलाईट बेस फ्री टोलिंग सिस्टिम (Satellite Base Free Tolling System) तयार करत आहे. ज्यामुळे आता टोलनाके राहणार नाहीत. टोल भरण्यासाठी आता तुम्हाला कोणी अडवणार नाही. कॅमेऱ्याद्वारे तुमच्या नंबरप्लेटवरून टोल घेतला जाईल. तुम्ही जिथून निघालात तिथपासून तुम्ही जिथून बाहेर पडाल तिथपर्यंतचाच टोल थेट तुमच्या बँक खात्यातून कापला जाणार आहे.” असं नितीन गडकरी यांनी म्हंटल आहे.
#mumbai https://t.co/gF2HfzqWNN
— Vaibhav Potode (@VaibhavPotode) April 14, 2025
दरम्यान, आता टोल भरण्यासाठी तुम्हाला रांगेत उभे राहण्याची गरज नाही. टोल सुविधा आता सोपी केली जाणार आहे. जर तुमची गाडी कोणत्याही महामार्गावरून जात असेल तिथपासून तुम्ही जिथून बाहेर पडाल तिथपर्यंतचाच टोल तुमच्या बँक खात्यातून कट केला जाईल. अशातच आता रस्त्यांवरील टोल नाके पूर्णपणे बंद होणार आहेत.